क्राइम
तुमसर ठाणेदारापासुन जनता त्रस्त
ठाणेरादाला हटविण्यासाठी पोलीस अधीक्षकाला मनसे कडून निवेदन
तुमसर वार्ता:-भंडारा जिल्ह्यातील तुमसर पोलीस स्टेशन हा भंडारा जिल्ह्यातील मोठा पोलीस स्टेशन असुन ह्या क्षेत्रात अवैध धंदे, चोरी ह्या वर दिवसेंदिवस वाढ होत आहे व वर्तमान पोलीस निरीक्षक यांच्या कडून कोणतेही ठोस पाऊल न उचलला जात असल्याची माहिती मनसे तुमसर शहर संघटक अश्विन देशमुख यांनी पोलीस अधीक्षक नुरुल हसन यांना निवेदनात दिली.
देशमुख यांनी निवेदनात लिहिले की वर्तमान ठाणेदार यांची वागणूक जनतेसी उर्मठपणाची असल्याचेही निवेदनात नमूद केले.
देशमुख यांनी अशा अकार्यक्षम अधिकाऱ्यांचे त्वरित स्थानांतर करावे अशी मागणी केली. अशा अनेक तक्रारी वर्तमान पोलीस निरीक्षकांबद्दल असल्याचे बोलले जाते आहे.



