क्राइम
नवीन थानेदार रुजु.
पदभार सांभाळताच अवैध धंद्यांवर धाड
भंडारा जिल्हा वार्ता:-मिळालेल्या माहितीनुसार भंडारा जिल्ह्यातील मोहाळी तालुक्यातील आंधळगाव पोलीस स्टेशन येथे पोलीस निरीक्षक ह्या पदावर नितीन राठौड यांनी ह्या पदाचा पदभार सांभाळला, ह्या पुर्वी ते नवी मुंबई येथे कार्यरत होते.
पोलीस निरीक्षक नितीन राठौड आंधळगाव पोलीस स्टेशन ला रुजु होताच अवैध धंद्यांना आळा घातले.
पदभार सांभाळताच मोहफुल दारु, रेती तसेच जुगार अड्यावर धाड घालुन 21 लाख 40 हजार 110 रुपयांचा मुद्देमाल जप्त करुन आरोपी विरुद्ध गुन्हा नोंद करण्यात आला.

मा. राठौड साहेबांनी सांगितले की अवैध धंदे वर अंकुश लावणे व परिसरात शांतता व सुव्यवस्था राखण्यासाठी अथक प्रयत्नशील राहु हा त्यांचा मुख्य ध्येय आहे.



