क्राइम
धारदार शस्त्राने केला वार
बघेडा गावची घटना
तुमसर वार्ता:- गोबरवाही पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या बघेडा गावात एका सख्या भावाने भावाला धारदार चाकूने वार करुन गंभीर जख्मी केले. बघेडा निवासी पोलीस पाटील तालीब सिद्दिकी यांच्या तक्रारी वर गोबरवाही पोलीसांनी आरोपी कार्तिक लाळे ला ताब्यात घेऊन धारा 109 च्या तहत मामला दर्ज केला.
माहिती मिळाली की दोन्ही भावामध्ये जुन्या वादावरून आपसात झगडा सुरू होता. घटनेच्या दिवसी जुन्या वादावरून कार्तिक लाळे ने राजकुमार लाळे वर धारदार शस्त्राने वार केला त्यामुळे तो गंभीर जखमी झाला.
ह्या सर्व प्रकरणाचे तपास ठाणेदार शरद शेवाळे व सहकर्मी करत आहेत.




