क्राइम

अवैध रेती वाहतूकीवर पोलीसांची मोठी कार्यवाही…

तुमसर वार्ता:-भंडारा जिल्ह्यातील तुमसर पोलीस स्टेशन चे कर्मचारी पेट्रोलिंग करीत असताना कृषी उत्पन्न बाजार समितीच्या समोर तिन टाटा कंपनी चे तिन बाराचाकी १) MH/CZ 2792 चा चालक मालक सोमेंन्द्र हलमारे रा. बासोरा २) टीप्पर क्रं MH-40-7750 चे चालक मालक अक्षय लुटे रा. बासोरा ३) टीप्पर क्रं. MH-40CZ-4141 चे चालक मालक प्रशांत बारसागडे रा. सोनेगाव तालुका जि. भंडारा हे आपल्या वाहनात तामसवाडी रेती घाटावरून बिना परवाना अवैध रेती अंदाजे 10 ब्रास किंमत 60 , 000/- चोरी करून नेत असताना आढळून आले तसेच टीप्पर वाहन व रेती सह एकुण 91 लाख 80 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करुन वाहन चालक मालक यांच्या वर गुन्हा नोंद करण्यात आला.
सदर ची कार्यवाही तुमसर चे पोलीस कर्मचारी करत आहेत.
तुमसर पोलीस स्टेशन ने तामसवाडी व तुमसर पोलीस स्टेशन परिसरात अन्य घाटातील अवैध टीप्परवर अजुन कार्यवाही करणे गरजेचे आहे .

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button