भंडारा जिल्ह्यातील ह्या पोलीस स्टेशन ला हात भट्टी वर छापा
आष्टी-नाकाडोंगरी नाल्या जवळील घटना
भंडारा जिल्हा (क्राईम वार्ता) :-भंडारा जिल्ह्यातील गोबरवाही पोलीस स्टेशन चे ठाणेदार शरद शेवाळे यांनी वेळोवेळी अवैध धंद्यावर छापे मारुन अवैध धंदे वाल्यांचे नाकी नऊ आणले त्यामुळे ह्या थान्याअंतर्गत येणाऱ्या परिसरात शांतता सुव्यवस्था चा कठोर पणे पालन होत आहे.
गुप्त माहिती नुसार शरद शेवाळे ठाणेदार गोबरवाही यांच्या सुचनेनुसार पोहवा गौरीशंकर कडव यांच्या नेतृत्वाखाली तुमसर तालुक्यातील आष्टी कडून नाकाडोंगरी येत असलेल्या नाल्याजवळ हात भट्टी दारु काढतांना पकडण्यात आले. घटनास्थळी पोलीस पोहचताच हात भट्टी मालक राहुल शेंडे पसार झाल्याची माहिती मिळाली आहे.
जप्ती माल 23 प्लास्टिक बॅग मध्ये 690 किलो सडवा मोहफुल आणि निळ्या रंगाचे ड्रम मध्ये 50 किलो सडवा मोहफुल अशी मिळुन एकुण किंमत 1लाख 48 हजार रुपयांचा माल जप्त करुन नष्ट करण्यात आला.
फरार आरोपी राहुल शेंडे यांच्या विरुद्ध विविध कलमासह मामला दाखल करण्यात आला.

पुढील तपास मा. शरद शेवाळे पोलीस निरीक्षक गोबरवाही यांच्या मार्गदर्शनाखाली पोहवा किशोर खोब्रागडे व पोशि नेपाल गभने करत आहेत.



