” इंडियन रेडक्रॉस सोसायटी जिल्हा शाखा भंडारा तर्फे रेड क्रॉस दिवस साजरा ,,,,
(मा. नानाभाऊ पटोले आमदार साकोली यांच्या मातोश्री , मा.सुनील फुंडे यांच्या मातोश्री यांचे सह ऑडनस फॅक्टरी भंडारा येथील व पहलगाम कश्मीर येथील मृतात्म्यांना भावपूर्ण श्रद्धांजली, 125 व्या रेड क्रॉस संदेशाचे आगामी प्रकाशनाची भव्य तयारी,
भंडारा वार्ता:-
इंडियन रेड क्रॉस सोसायटी जिल्हा कार्यालय तुरसकर नर्सिंग होम भंडारा येथे 8 मे जागतिक रेडक्रॉस दिवस साजरा करण्यात आला.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी चेअरमन डॉक्टर अशोकराव ब्राह्मणकर, डॉक्टर चंद्रमोहन गुप्ता उपाध्यक्ष, डॉक्टर नितीन तुरसकर सेक्रेटरी हे होते.
दुसऱ्या महायुद्धाच्या वेळी न्यूयॉर्क येथील जेन हेंनंरी डुआन्ट व यांच्या सहकार्यांनी जागतिक स्तरावर रक्तपात होऊ नये, मानवीय शांतता राखावी व माणसाने माणसाच्या सुख -दुखात मानवतेने सहभाग घ्यावा, आपत्कालीन परिस्थितीत मानवीय मदत करता यावी या हेतूने जागतिक रेड क्रॉस ची 8 मे रोजी स्थापना करण्यात आली.
त्या अनुषंगाने 183 वा जागतिक रेड क्रॉस दिवस साजरा करण्यात आला आला. त्यानिमित्त जिल्हा शाखा भंडाराचे संस्थापक स्वर्गीय डॉ. एल. डी. गिरीपुंजे यांची हृदय आठवण करून त्यांचे नावाची रेड क्रॉस तर्फे लावण्यात आलेल्या *उन्हाळी पानपोईला डॉ. ब्राह्मणकर, डॉ.गुप्ता, मीरा भट, राजू खवसकर यांनी भेट दिली.

रेड क्रॉस दिवसानिमित्त आमदार नानाभाऊ पटोले यांच्या मातोश्री , मा. सुनील जी पुंडे यांच्या यांचे सह ऑर्डनन्स फॅक्टरी भंडारा येथील व पहलगाम काश्मीर येथील मृतात्म्यांना सामूहिक भावपूर्ण श्रद्धांजली वाहण्यात आली.
इंडियन रेड क्रॉस सोसायटी जिल्हा शाखा भंडारा तर्फे मानवीय हिताच्या कार्याचे अवलोकन करून *भंडारा जिल्ह्यातील सर्वांगीण* इतिहासाची गाथा ( सामाजिक, शैक्षणिक, धार्मिक, ऐतिहासिक यांचे सह रेड क्रॉस च्या कार्याची गाथा) 125 व्या महापुस्तकातून रेडक्रॉस तर्फे प्रकाशित करण्याचा ठराव बहुमताने पारित करण्यात आला. तसेच आपत्कालीन स्थितीमध्ये सामान्य नागरिकांनी कोणत्या बाबींची सतर्कता घेऊन प्रसंगावधानानुसार आपत्तीत सापडलेल्यांचे जीव वाचवता येईल या हेतूने फायर सेफ्टी लिटरसी चे आयोजन लवकरच करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले.
याप्रसंगी डॉ.जयंता गिरीपुंजे, दीपक व्यवहारे आजीवन जेष्ठ सदस्य, समाजसेविका मीराभट्ट, साहित्यिक राजूभाऊ खवसकर, हेमंत चंदवासकर , रक्तरत्न प्रीतम कुमार राजाभोज यांचे सह रवीसंकर साकोरे, रत्नेश कोहरु, नरेंद्र साकोरे उपस्थित होते.
प्रस्ताविक डॉक्टर चंद्रमोहन गुप्ता आभार प्रीतम कुमार राजाभोज यांनी केले.
राजू खवसकर साहित्यिक
आजीवन सदस्य इंडियन रेड क्रॉस सोसायटी जिल्हा शाखा भंडारा.