क्राइम
गोबरवाही पोलीसांची दारु अड्यावर छापेमारी
30 लिटर मोह फुल दारु व 180 किलो सडवा मोहफुल जप्त
तुमसर वार्ता:-गोबरवाही पोलीस स्टेशन चे ठानेदार शरद शेवाळे यांनी पदभार सांभाळताच ह्या परिक्षेत्रात होणाऱ्या अवैध धंद्यावर अंकुश लावला आहे. अवैध धंदेवाईक लोकांचे धाबे दनानले आहेत.

गोबरवाही थाना अंतर्गत येणाऱ्या पवनारखारी येथे जंगल परिसरात हातभट्टी ची दारु काढणाऱ्या आरोपी सुनील सेवकराम ऊईके यांच्या वर पोलीसांनी कार्यवाही केली त्याच्याकडून 60 किलो मोहफुल सडवा 3 बॅग, रबर ट्यूब मध्ये 30लिटर भरलेली दारु 21,000/-रु.चा मुद्दे माल जप्त केला. आरोपी यांच्या विरोधात मामला दर्ज करुन कार्यवाही

गोबरवाही पोलीस स्टेशन चे ठानेदार शरद शेवाळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक अजय रोडे, पोलीस हवा. नेपाल गभने व पोलीस सिपाई उपरीकर करत आहेत.



