गोबरवाही पोलीस स्टेशन हद्दीतील गावामध्ये बालविवाह प्रकरणात कार्यवाही
भंडारा,:अक्षय तृतीया या सनाच्या मुहुर्तावर बाल विवाह होण्याची शक्यता नाकारता येत नाही यासाठी आवश्यक प्रतिबंधात्मक कारवाही करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी यांचे कडुन दि. 17 एप्रिल, 2025 रोजी देण्यात आले त्यानुसार भंडारा जिल्हयातील वर्तमान पत्रात व्यापक प्रसिद्धी करण्यात आली.
प्रसिद्ध झालेल्या बातमीच्या आधारावर पोलीस स्टेशन गोबरवाही यांच्या हद्दीतील एका गावात बालविवाह झाल्याची गोपनीय माहिती महिला व बाल विकास विभागाच्या चाईल्ड हेल्पलाईन क्र. 1098 या टोल फ्री क्रमांकावर मिळाली त्यामाहितीनुसार तुषार व पौनिकर जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी भंडारा यांच्या मार्गदर्शनात टिम तयार करुन बालविवाह झालेल्या ग्रामपंचायत तसेच बालीकेच्या घरी भेट देण्यात आली. सदर भेटीवेळी मुलीच्या पालकांनी बालीकेचे विवाह ता. बालाघाट जि. शिवनी (म.प्र.) येथील युवकासोबत करुन दिले त्यादिवशी बालीका ही अल्पवयीन असल्याचे बाल विवाह प्रतिबंध अधिकारी व सरपंच यांच्या समक्ष मान्य केल्याने ग्रामसेवकयांचेकडुन
पोलीस स्टेशन गोबरवाही चे ठानेदार शरद शेवाळे
व त्यांची टीम ने राजापूर येथे बाल विवाह प्रतिबंध अधिनियम 2006 नुसार गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
सदर प्रकरणात जिल्हा बाल संरक्षण कक्षातील श्री.नितीनकुमार साठवणे जिल्हा बाल संरक्षण अधिकारी, शिल्पा ज. वंजारी संरक्षण अधिकारी, कु. सविता सोनकुसरे सामाजिक कार्यकर्ता तसेच चाईल्ड हेल्पलाईन भंडारा येथील श्रीमती लोकप्रिया देशभ्रतार जिल्हा समन्वयक, केस वर्कर सुरेखा गायधने, अक्षय खोब्रागडे,विक्की सेलोटे यांचे मदतीने कार्यवाही पुर्ण करण्यात आली आहे.
अशा बालविवाहच्या प्रकरणात कोणतीही माहिती असल्यास तत्काळ 1098 या टोल फ्री क्रमांकावर संपर्क साधण्याचे आव्हान करण्यात आला