लग्नाच्या पुर्वी नवरदेव झाला गायब
लग्नाच्या तारखेनंतर मिळाला नवरदेवाचा विहरीत शव
तुमसर (गोबरवाही क्राईम वार्ता) :-तुमसर तहसील मधिल गोबरवाही पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या आलेसुर गावातील राहुल राऊत वय 26 वर्ष ह्या मुलाचा लग्न होणार होता पण लग्नाच्या तिन दिवसापूर्वीच घरुन गायब झाला. परिवारातील लोकांनी रिस्तेदारी व आजूबाजूच्या गावी पाहणी केली पण मिळुन न आल्याने गोबरवाही पोलीस स्टेशनला परिवारातील लोकांनी गुमशुदा ची तक्रार दिली. त्यानंतर पोलीस आणि परिवारातील सदस्यांनी छानबिन केली.

तिन दिवसानंतर गावाजवळील शेतातील विहरीत त्या ईसमाजी मृत्यू पडलेला शव दिसला. ह्या घटनेची माहिती पडताच गोबरवाही पोलीस स्टेशन चे ठाणेदार शरद शेवाळे व त्यांची टीम घटनास्थळी पोहचुन तेथील विवेकपुर्व परिस्थिती हाताळली पण त्याच्या शरीरावर कोणतेही जखम निशान नाही दिसून पडले.
मृतकाची लाश शवविच्छेदनासाठी तुमसर शासकीय रुग्णालयात पाठविण्यात आले.
गोबरवाही पोलीसांनी आकस्मित मृत्यू चा मामला दर्ज करुन पुढील तपास गोबरवाही पोलीस निरीक्षक शरद शेवाळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार लंकेश्वर रागोर्ते करीत आहेत.