पाथरी गावात महाराष्ट्र दिन व कामगार दिन साजरा करण्यात आला…
रोजगार हमी कामगारांना अल्पोहार वाटप व कॉलरशिप परीक्षेत पास होणाऱ्यांचा सत्कार.
तुमसर (पाथरी ग्रामपंचायत वार्ता) :- तुमसर पंचायत समिती अंतर्गत येणाऱ्या पाथरी गावातील ग्रामपंचायत मध्ये 1 मई महाराष्ट्र दिन व कामगार दिन साजरा करण्यात आला. या निमित्ताने ग्रामपंचायत पाथरी येथे झेंडावंदन करुन पुजा अर्चना करण्यात आली.

ह्या कार्यक्रमामध्ये जिल्हा परिषद च्या प्राथमिक शाळेतील कॉलरशिष परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या१) अमृता पांडुरंग गहाने २) अर्णव गौरव नांदगाये ३)एंजल संजय पंचीपात्रे ४)अनन्या अनीश शेरे ५)त्रिशा आनंद नंदरधने६) शिवम कैलास करकाळे सहा विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला.
त्यानंतर रोजगार हमी वरील कामगारांना अल्पोहार वाटप करण्यात आले.


ह्या सर्व कार्यक्रमात सरपंच विद्याताई कोहळे ,उप सरपंच ऋषि खुने सदस्य शुभम बरिये, गणेश भोंडे, पुनम नांदगाये, मंदाताई गौरे, समताताई करकाळे, खांजुराताई कापगते, मनुबाई धुर्वे, सविताताई परतेती, शाळा समितीचे अध्यक्ष गौरव नांदगाये, उपाध्यक्ष गुरुदेव परतेती, ग्रामविकास अधिकारी ए. सी. बोरकर तसेच रोजगार सेवक धर्मेंद्र सानसरोदे, सर्व ग्रामपंचायत , मुख्याध्यापक डी. डी. ऊके, भोसले सर, पठाण सर, शिंदे मॅडम, मारबदे सर, बरखा मॅडम, नेवारे मॅडम तसेच पोलीस पाटील ईश्वरी गौरे मॅडम आणि गावातील नागरिक उपस्थित होते.