तुमसर पंचायत समितीच्या रेकॉर्ड रुमला कशी आग लागली ❓

आगीचे कारण संशयास्पद
तुमसर वार्ता:-दिनांक 26 एप्रिल ला सकाळी 8 वाजे दरम्यान तुमसर पंचायत समितीच्या नवीन रेकॉर्ड रुमला भिषण आग लागल्याची माहिती समोर आली आहे.
आग ईतकी भिषण होती की आग विझविण्यासाठी दोन अग्निशमन दलांना यावे लागले. त्यांच्या प्रयत्नानंतर आग आटोक्यात आली. या आगीचे नेमके कारण शार्ट सर्किट सांगितले जाते पण तुमसर शहरात व परिसरात वेगवेगळ्या चर्चा सुरु आहेत.
विशेष म्हणजे आठवड्यापूर्वी पंचायत समितीच्या वतीने 1965 पासूनचे जुने रेकॉर्ड बाल विकास व बचत गटाच्या ईमारतीत स्थलांतरित करण्यात आले होते. त्यामुळे काय जळले हे अजून कळलेच नाही. रेकॉर्ड चे वर्गीकरण केले की नाही हे अद्याप कोणालाही माहीत नाही.

शनिवारी कार्यालयात सुट्टी असते सुट्टी च्या दिवशी च व रिकॉर्ड स्थलांतरितांच्या नंतर च आगीची घटना कशी झाली असे अनेक प्रश्न नागरिक बोलत आहेत.
विशेष म्हणजे 24 एप्रिल 2025 रोजी झालेल्या पंचायत समितीच्या मासिक सभेत जुन्या जिर्ण (उदई) रेकॉर्ड ला जाळण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली होती…
दोन दिवसांतच रेकॉर्ड रुमला आग लागण्याची घटना अधिकच संशय निर्माण करत आहे.
पंचायत समिती स्थरावर शार्ट सर्किट ने लागल्याची बोलले जात आहे परंतु काही नागरिकांकडून चर्चा केली जाते की हि आग मुद्दाम म्हणून लावलेली आहे.
संबधित यंत्रणेने गांभीर्याने लक्ष पारदर्शक तपासणी करावी अशी नागरिकांनी मंशा व्यक्त केली.



