क्राइम
गोबरवाही पोलीसांची मोठी कार्यवाही
स्कोडा कार मध्ये सुगंधित तंबाखू जप्त
तुमसर वार्ता:-तुमसर तालुक्यातील गोबरवाही पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या पवनारखारी रेल्वे फाटकाजवळ स्कोट गाडी क्रमांक MH-14 DF 0154 ह्या गाडी ची चौकशी केल्यानंतर गाडी मध्ये 30 बॅग सुगंधित तंबाखू आणि एका प्लास्टिक शैलीत पानमसाला व 29 प्लास्टिक थैल्या मध्ये अलग अलग मसाला गुटखा आढळून आले ज्यांची कि. अंदाजे 2,50000/- असा मुद्दे माल जप्त करण्यात आला
आरोपी मोहमद अंसारीटीपु सुलतान संघर्ष नगर नागपूर तसेच वहीद अंसारी यशोदा नगर नागपूर ईथले रहिवासी यांच्या वर गुन्हा दाखल करुन यांना ताब्यात घेण्यास आले.
पुढील तपास पोलीस निरीक्षक शरद शेवाळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक निवृत्ती गीते, मंगेश पेंदाम गोपनिय शाखा हे करत आहेत.




