IAS परीक्षेत घवघवीत यश…
भंडारा/गोंदिया जिल्हा वार्ता:-केन्द्रीय लोकसेवा आयोग 2024 मध्ये डॉ. पंकज मनोहर पटले तिरोडा तालुक्यातील ठानेगाव ह्या छोट्याशा गावातील एक सामान्य शेतकरी कुटुंबातील वाढलेला मुलगा होता. मात्र स्वप्न पण मोठे होते! IAS परिक्षेत घवघवीत विजय मिळवून त्याने तिरोडा तहसील मध्ये नाही तर संपूर्ण गोंदिया जिल्ह्याचा नाव रोशन केला. वडील श्री. एस. एम, पटले सर हे नुकतेच जिल्हा परिषद प्राथमिक शाळा गाव दादरी येथुनसेवानिवृत्त झाले. आई सौ. लता पटले ह्या गृहीनी असुन घर सांभाळलत पंकज च्या यसामागे खंबीर उभ्या राहिल्या. पंकज चा भाऊ एमबीबीएस करून डॉक्टर असून तो सुध्दा स्पर्धा परिक्षेची तयारी करत आहे.

पंकज याचे बाराहवी पर्यंत चे शिक्षण नवोदय विद्यालय नवेगाव बांध येथे झाले. त्याच्या यसामागे घरच्या लोकांची साथ, शिक्षनाची जिद्द व श्रध्दा आहे.

ठानेगाव व गोंदिया जिल्ह्यातील सर्व नागरिकांनी पंकज चे कौतुक केले.