Uncategorized
डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्त विविध कार्यक्रम…
तुमसर वार्ता:-तुमसर तालुक्यातील नाकाडोंगरी येथे भिम मेळावा उत्सव समिती नाकाडोंगरी तर्फे१४ एप्रिल डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्ताने विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत. ह्या १३ एप्रिल ला विद्यार्थ्यांची स्पर्धा परीक्षा घेण्यात येईल उतार् विद्यार्थ्यांना पारितोषिक व शिल्ड वितरण करण्यात येईल. १४ एप्रिल ला डॉ.बाबासाहेब आंबेडकर स्मारकाजवळ सकाळी पुजा सायंकाळी भव्य भिम रेलीचे आयोजन करण्यात येणार आहे.

आणि १५ एप्रिल ला सांयकाळी भोजनदानाचे आयोजन केले आहे तसेच रात्री ७ वाजता दिदी अंजली भारती यांची कव्वाली ग्रामीण सचिवालय नाकाडोंगरी च्या पटांगणावर ठेवण्यात आले आहे. *भिम मेळावा उत्सव समिती* नाकाडोंगरी तर्फे सर्व जनतेला आव्हान केले की ह्या सर्व कार्यक्रमात उपस्थित रहावे.
