घरफोडी चे आरोपी पोलीसांच्या ताब्यात…
तुमसर वार्ता:-पोलीस कि आवाज न्युज नेटवर्क ला मिळालेल्या माहितीनुसार गोबरवाही पोलीस स्टेशन हद्दीतील फिर्यादी पाथरी गावातील सौ. निलेश्वरी सेवकराम राऊत गाव पाथरी यांच्या घरातील काही महिन्यांपूर्वी घर फोडून मागच्या दारातून घर फोडून सोने आणि चांदीचे सामान लंपास केले होते. गोबरवाही पोलीसांच्या अथक प्रयत्नानंतर आरोपी १) शैलेश उर्फ छानेन्द्र रा. बाम्हनी ता. आमगाव जि. गोंदिया २)रामकिसन तिवाडे रा. खैरलांजी ता. तुमसर हल्ली मु. मालवीय वार्ड तुमसर ३) आकाश कोल्हटकर रा. मालवीय वार्ड तुमसर यांना ताब्यात घेऊन कसुन चौकशी केली असता आरोपी यांनी चोरी चा गुन्हा करण्याची कबूली केली व त्यांच्या कडून चोरी केल्याचा मुद्दे माल जप्त केला. चोरी झालेल्या मालात सोन्याचे सामान ८७,०००- रु.तसेच चांदीचे सामान ७,५००/-व नगदी रक्कम ५,०००/-रुपये असा एकुण ९९,५०० रु चा मालाची चोरी झाल्याचे पोलीस स्टेशन गोबरवाही येथे गुन्हा नोंद करण्यात आला होताहोता व त्यांना ताब्यात घेण्यात आले.
पुढील तपास मा.जिल्हा पोलीस अधीक्षक नुरुल हसन यांच्या मार्गदर्शनाखाली गोबरवाही पोलीस स्टेशन चे ठाणेदार शरद शेवाळे करीत आहेत.