Uncategorized
खापा येथे रमाबाई भिमराव आंबेडकर यांची जयंती साजरी करण्यात आली.
खापा (तुमसर) : दिव्यांग संघटना तुमसर तालुका व परमात्मा एक मानव विकास यांच्या सयुक्त विद्यमाने आज दिनांक ७ फरवरी २०२५ रोजी रमाबाई भिमराव आंबेडकर यांची जयंती दिंव्याग संघटना कार्यालय खापा येथे साजरी करण्यात आली.
याप्रसंगी कार्यक्रमाचे उद्घाटीका डॅा. कीर्तीताई भुरे, अध्यक्ष सौ. किर्तीताई राजेंद्र पिकलमुंडे ह्या होत्या प्रमुख पाहुणे डॅा. मनोजकुमार नंदेश्वर पशुवैद्यकीय अधिकारी,खापा, माटे ताई, वंजारी ताई, शेषराव गणविर (तुमसर तालुका प्रमुख प्रहार दिव्यांग संघटना), यादवराव बुराडे (परमात्मा एक मानव विकास) टवरचंद हाडगे,टेटेजी,शालेय विद्यार्थी,अंगणवाडी विद्यार्थी तसेच दिव्यांग बांधव उपस्थित होते.
