Uncategorized

अबधा फाऊंडेशन तुमसर च्या वतीने मोफत आरोग्य तपासणी

अबाधा फाऊंडेशन तुमसर चा वतीने मोफत आरोग्य तपासणी.
पोलीस कि आवाज न्युज नेटवर्क वार्ता:-

दिनांक १५/०५/२०२२ रोज रविवारला अबाधा फाऊंडेशन तुमसर च्या वतीने अबाधा स्वास्थ्य या उपक्रमांतर्गत ग्राम नवेगाव (धू.) येथे “मोफत आरोग्य तपासणी व औषध वितरण शिबिर” घेण्यात आला. तत्पूर्वी संस्थेच्या कर्मचारी व स्वयंसेवक वर्गांनी घरोघरी जाऊन, संपूर्ण गावात प्रभातफेरी काढून व पथनाट्याच्या माध्यमातून स्वच्छतेसंबंधी जनजागृती केली. त्या नंतर ग्रामपंचयत कार्यालय नवेगाव (धू.) येथे मा. डॉ. भजनकर सर यांनी जनतेच्या आरोग्याची तपासणी करून संस्थेच्या वतीने मोफत औषध वितरण करण्यात आले. या शिबिराचा गावातील नागरिकांनी लाभ घेतला. सदर शिबिर संस्थेच्या व्यवस्थापकीय संचालिका मा. माधुरीताई पटले यांच्या मार्गदर्शनाखाली संस्थेचे कर्मचारी व स्वयंसेवक वर्ग यांनी अथक परिश्रम घेऊन सुरळीत पार पाडले.

स्वार्थी करमकर.
महीला प्रतिनिधी
तालुका तुमसर
पोलीस की आवाज न्यूज नेटवर्क

*पोलीस कि आवाज* न्युज नेटवर्क च्या ग्रुपमध्ये सामिल होऊन दररोज बातम्या बघा.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button