बुद्ध जयंती बौद्ध धम्मातील सर्वात आनंदाचा सण -संजीव भांबोरे राज्य सरचिटणीस
पोलीस कि आवाज न्युज नेटवर्क
भंडारा -बुद्ध जयंती हा बौद्ध धम्मातील सर्वात आनंदाचा सण व सर्वात महत्त्वाचा आहे. हा सण सर्वांनी मोठ्या उत्साहात साजरा करायला पाहिजे. परंतु या बुद्ध जयंती कडे आपण दुर्लक्ष करून बौद्ध धम्माचे महत्व आपण कमी करत आहोत. बुद्ध जयंती चे महत्त्व कमी करणे म्हणजे धम्माचा ज्या पद्धतीने प्रचार व्हायला पाहिजे त्या पद्धतीने प्रचार न होता बुद्ध धम्माची अधोगती होताना दिसत आहे. ते शांतीवन बुद्ध विहार चिचाळ येथे शिवली बुद्ध व सम्राट अशोक स्तंभाचे अनावरण कार्यक्रम प्रसंगी मार्गदर्शन करतांना प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाचे राज्य सरचिटणीस संजीव भांबोरे बोलत होते. दिनांक 16 मे 2022 रोजी सोमवारला भंडारा जिल्ह्यातील पवनी तालुक्यातील शांती वन बुद्ध विहार चिचाळ येथे शिवली बुद्ध व सम्राट अशोक स्तंभाचे अनावरण विनय बोधी, नागसेन भंते ,अय्याजी पटाचारा यांच्या उपस्थित करण्यात आले .यावेळी तथागत गौतम बुद्ध व भारतरत्न डॉ .बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याचे पूजन करून माल्यार्पण करण्यात आले .त्याचप्रमाणे सामूहिक बुद्ध , धम्म वंदना, संघ वंदना घेण्यात आली .यावेळी भिकू संघांना सामूहिक भोजनदान देण्यात आले. कार्यक्रम यशस्वी करण्याकरिता जीवन बोधी बौद्ध ,धम्मरक्षीत बौद्ध, अश्विन बौद्ध, आसिस मेश्राम, लिमचंद बौद्ध, प्रशांत बोधले, सुरेंद्र सिंग बुंदेले ,राहुल गोडबोले ,जनार्दन सुखदेवे दीपक खोब्रगडे ,सत्यफुला बौद्ध, ज्योती उके, लता बौद्ध( भांबोरे )सुरेश उके ,पंचफुला सुखदेवे, सकुंतला गोडबोले, नंदाताई त्याचप्रमाणे धम्माचा चीवर धारण करणारे मोगलि पुत्त, गुणवर्धन,गोवर्धन नागसेन, प्रज्ञा शील ,विनय शील येस, महामोगलान, बुद्ध पाल यावेळी प्रामुख्याने उपस्थित होते. कार्यक्रमाचे संचालन लिमचंद बौद्ध यांनी केले तर आभार दीपक खोब्रागडे यांनी मानले.