
वरठी वार्ता:- मा.जिल्हाधिकारी भंडारा यांनी १७/१२/२०२४ ला आदेश काढले होते की मार्ग वरठी, एकरालारी, सातोना ह्या मार्गावरून चालणाऱ्या जड वाहनास बंदी लावली होती, त्याचबरोबर सनफ्यॉग ला जाणारी बस ही बंद करण्यात आली होती.

परंतु काही सनफ्यॉग शाळेतील पालक व प्रवासी यांनी आमदार राजुभाऊ कारेमोरे यांच्या कडे समस्या घेऊन आले त्यामुळे आमदार राजुभाऊ यांनी स्वत: घटनास्थळी भेट घेतली व चौकशी केली.
एसटी डेपो ला सनफ्यॉग बस सुरू करण्याचे आदेश दिले.