एका व्यक्तीला चाकूने मारल्याची घटना…
तुमसरात आताही प्राणघातक हल्ले…
तुमसर वार्ता:-तुमसर पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या तुमसर शहरात गेली कित्येक क्राईम गुन्हे होत होते. पण आजच्या काळात सुध्दा क्राईम गुन्हे कमी होत नाही असी माहिती समोर येत आहे.
ईथे मोबाईल चोर,घरातील चोरी, महिलांवरील होणारे अत्याचाराचे गुन्हे, मारपीट खुन खराबा असे गुन्हे तुमसर पोलीस स्टेशनला घडत असल्याची माहिती समोर येत आहे.मग
अशा सर्व गुन्ह्यांवर अंकुश कोण लावणार❓

अशी च एक घटना तुमसर पोलीस स्टेशन तुमसर शहरात घडलेली आहे.
तुमसर शहर वार्डातील रेवा रहांगडाले घटनेच्या दिवशी रात्री 10 वाजे. दरम्यान घरासमोर एका मित्राकडे बसला असताना आरोपी कार्तिक राऊत व आरोपी च्योख्या राऊत व उमेश मस्के ह्या तिघांना फिर्यादी रेवा रहांगडाले यांच्या सी वाद घालुन धारदार शस्त्राने वार केला. जखमी रेवा रहांगडाले ने पोलीसांत तक्रार दिली. तक्रारी वरुन आरोपी कारागृहात गेले. कारागृहातून बाहेर येताच तिघांनी बदला घेण्याच्या बेताने घटनेच्या दृष्टीने रात्री 10 वाजे दरम्यान वाद घालुन आरोपी कार्तिक याने धारदार शस्त्राने वार करुन जिवे मारण्याचे प्रयत्न केले.
जखमी रेवा रहांगडाले याला उपचारासाठी खाजगी रुग्णालयात दाखल केले असुन प्रकृती चिंताजनक असल्याचे बोलले जात आहे.
सदर गुन्हा तुमसर पोलीस स्टेशनला नोंद असुन सदर घटनेचा तपास तुमसर पोलीस करीत आहेत.
आरोपी आताही फरार आहे.