भंडारा पोलीसांतर्फे आवश्यक सुचना…
भंडारा जिल्हा वार्ता:-भंडारा जिल्हाचे पोलीस अधीक्षक मा. नुरुल हसन यांनी हॉटेल,व लॉच च्या मालकांना बोलवून त्यांची बैठक बोलावली व त्यांना विशेष सुचना देण्यात आल्या.
१) १८वर्षाखालील मुलांना आई , वडीलाशिवाय लॉज मध्ये प्रवेश देऊ नये.
२) सि. सि. टी. व्ही कॅमेरे लावून त्यांची क्षमता ९० दिवसाची असावी.
३) लॉज मधिल येणारे जाणऱ्यांची नोंद करुन पाच वर्षे जतन करुन ठेवावे.
४)लॉजमध्ये विदेशी व्यक्ती आल्यास त्याची सुचना पोलीस स्टेशनला द्यावी व सी फार्म भरुन जिल्हा विशेष शाखेत मेलद्वारे पाठवावे.
५) लॉजमध्ये कोणत्याही अमली पदार्थांचे सेवन करु नये.

६) भंडारा जिल्हा नक्षलग्रस्त जिल्हा गडचिरोली व गोंदिया जिल्हा ला लागुन असल्याने नक्षलग्रस्त चळवळ ईसम आढळताच त्याची माहिती त्वरित पोलीस स्टेशन ला कळवावे.
७) आगामी काळात विधानसभा निवडणुकीतVIP लोकांचे दौरे मोठ्या प्रमाणात आहेत त्यामुळे लॉजमध्ये थांबणाऱ्या संसयीत व्यक्ती ची माहिती पोलीस स्टेशन ला कळवावे.
८) लॉजमध्ये कोणत्याही प्रकारचे अवैध धंदे होणार नाही याची दक्षता घ्यावी. असे एकूण आठ प्रकारच्या वापरासाठी सुचना देण्यात आल्या.