Uncategorized
राष्ट्रसंत तुकडोजी महाराज पुण्यतिथी महोत्सव कार्यक्रम आयोजन
आष्टी गावात संपन्न होणार…!
तुमसर:- तुमसर तालुक्यातील आष्टी गावात येत्या १६ आक्टोबर ला श्री. गुरुदेव सेवा मंडळ व आष्टी ग्रामवासी यांच्या माध्यमातून राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांची पुण्यतिथी कार्यक्रमाचे आयोजन आष्टी येथे करण्यात आले. पुण्यतिथी चा कार्यक्रम २२ आक्टोबर पर्यंत संपन्न होणार आहे. दररोज सायंकाळी सामुदायिक ध्यान, प्रार्थना श्री. गजाननजी हटवार व सहकारी यांचे द्वारे होणार असुन शारदा मातेची आरती महिला मंडळ द्वारे होणार आहे.
कार्यक्रमात प्रत्येक दिवशी वेगवेगळ्या मंडळातर्फे भजन व किर्तनाचे आयोजन करण्यात येणार आहेत.