ओव्हरलोड ट्रकमुळे रस्त्याचे वाजले बारा…
नाकाडोगरी मार्गे भरलेल्या रेती ट्रकमुळे
भंडारा जिल्हा वार्ता:-IPS नुरुल हसन साहेबांनी रेती तस्करावर वेळोवेळी कार्यवाही केली असल्याने सर्व पोलीस स्टेशन च्या अधिकाऱ्यांना सुचना देत असल्याने रेती चोरी करीता वेगवेगळ्या प्रकारच्या युक्त्या शोधुन रेती तस्करीसाठी करत असल्याचे तुमसर तहसील मध्ये चित्र दिसत आहे.
तुमसर तालुक्यातील सोंड्या गावाचा शासकीय घाट आहे तो घाट सिहोरा परीसरात येतो परंतु डेपो संचालक जास्त ट्रक सिहोरा पोलीस स्टेशन अंतर्गत पास करतो तर काही गोबरवाही मग रेती भरलेल्या ट्रकमुळे प्रदुषण तर वाढेल तसेच रस्त्याची सुध्दा हालत खालावेल मग नुकसान कुणाचा? पुर्वी च ह्या रस्त्याची हालत खालावलेली आहे. सोंड्या-महालगाव -कवलेवाडा-नाकाडोंगरी-गोबरवाही ह्या रस्त्यावरुन ट्रक आणने म्हणजे “जखमेवर मीठ चोळणे ” ह्या म्हनिप्रमाणे चित्र दिसत आहे.
यात काही रेती संचालकाचा गणीत तर नसवा… असे अनेक प्रश्न नाकाडोंगरी परीसरातील नागरिक अनुमान लावत आहेत⁉
बातमी प्रकाशित होताच वरीष्ठ अधिकारी काय पडताळणी करतात ह्याकडे सर्वांचे लक्ष वेधून आहे.