कायदेविषयक शासकीय सेवा व योजनांचा महामेळावा कार्यक्रम…
तुमसर वार्ता- राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण, सर्वोच्च न्यायालय नवी दिल्ली आणि मा. महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण, उच्च न्यायालय मुंबई यांच्या निर्देशानुसार जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, भंडारा व जिल्हा प्रशासकीय सर्व विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने कायदेविषयक, शासकीय सेवा व विविध योजनांचा महामेळावा आणि अंमलबजावणी शिबीर तुमसर न्यायालयात घेण्यात आला.
ह्यावेळी
मा. न्यायमूर्ती श्री. अनिल पानसरे खंडपीठ नागपूर, व श्री. राजेश अस्मर जिल्हा सत्र न्यायाधीश
यांच्या अध्यक्षतेखाली पार पडला.
कार्यक्रमाला प्रामुख्याने मा. श्री. डॉ. संजय कोलते जिल्हाधिकारी , मा. श्री. नुरुल हसन पोलीस अधीक्षक,मा.श्री.समिर कुर्तकोटी मुख्य कार्यकारी अधिकारी जि. प. भंडारा उपस्थिती होती.
कार्यक्रम बिजु गव्हारे सचिव जिल्हा विधी सेवा प्राधिकरण भंडारा, जे. आर. पाडगे दिवाणी न्यायाधीश,तुमसर, प्रशांत कुमार मिश्रा अध्यक्ष जिल्हा अधिवक्ता,विलास माटे अध्यक्ष अधिवक्ता तुमसर यांनी पार पाडला.
