लाचलुचपत विभागाची धमाकेदार कार्यवाही…
भंडारा जिल्हा वार्ता:-पोलीस कि आवाज न्युज नेटवर्क ला मिळालेल्या माहितीनुसार सेवानिवृत्त कर्मचारी मौजा जांंभळी येथे भूमापन क्र. 377 मध्ये.0.51 हेक्टर शेती असून ही शेती अक्रुषीक करण्यासाठी त्यांनी 29/03/023 ह्या रोजी नगर रचनाकार यांच्या अर्ज केला होता. नगर रचनाकार भंडारा यांनी सेवानिवृत्त कर्मचारी यांच्या अर्जावर कार्यवाही करुन पुढील कार्यवाही साठी तहसीलदार साकोली आणि उप अधीक्षक भूमि अभिलेख यांना पाठविले होते.
त्यानुसार तक्रारदार यांनी दिनांक 16/09/024 रोजी भुमीलेख कार्यालय साकोली येथे नकाशाच्या मोजनी साठी अर्ज केला.

नंतर तक्रारदाराने 17/9 ला भुमीलेख कार्यालय साकोली येथे व प्रविण गिरेपुंजे छानणी लिपिक यांना भेटुन नगर रचनाकार भंडारा यांनी सांगितलेल्या प्रमाने त्यांनी सांगितले की नगररचनाकार यांचे पत्र जुने आहे हे चालणार नाही तुम्हाला नवीन पत्र आनावे लागेल असे तक्रारदाराला सांगितले. तक्रारदार यांनी विनंती केली परंतु प्रविन गिरेपुंजे छानणी अधिकारी व राहुल ब्रह्यपुरीकर मुख्यालय सहाय्यक यांनी 20,000/- रु. ची मागणी केली परंतु तडजोडी ने 15,000/-मध्ये त्यांची तडजोड झाली.
तक्रारदाराने ही तक्रार भंडारा लाचलुचपत विभागात नोंद केली.
लाचलुचपत विभागाने सापळा रचुन 27/09 ला लाच स्विकारली.
ह्या प्रकरणाची पोलीस स्टेशन साकोली येथे प्रक्रिया सुरू आहे.