मुलांना शिळे व बुरशीजन्य आहार पुरवठा, कार्यवाही कोणत्या अधिकाऱ्यावर…
तुमसर वार्ता:- एकात्मिक बालविकास सेवा योजना नागरी प्रकल्प अंतर्गत अभ्यंकर नगर, हनुमान नगर यासह इतर भागात येत असलेल्या मुक्ताबाई अंगणवाडी केंद्रात निकृष्ट दर्जाचा आहार पुरवठा महिला बचत गटाच्या माध्यमातून देण्यात येत असल्याचे दिसून आले. यामुळे बालकांच्या जीवाशी खेळ करण्यात येत असल्याची माहिती अंगणवाडी सेविका बबिता सारंगपुरे यांनी स्वराज्य युवा एकता फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष तथा शिवसेनेचे विभाग प्रमुख अमित एच मेश्राम यांना सांगितले. मुक्ताबाई अंगणवाडीत पाठविलेल्या बालकांना चांगल्या पद्धतीचा आहार मिळत नसल्याने अंगणवाडी सेविकांनी याबाबत नगरपरिषदेच्या सहाय्यक प्रकल्प अधिकारी यमुना नागदेवे आणि बालविकास प्रकल्प अधिकारी तुषार पौवणिकर यांच्याकडे अनेकदा तक्रार केल्यानंतरही संबंधित अधिकारी याकडे दुर्लक्ष करीत असल्याचे सांगण्यात आले. अंगणवाडी सेविकेने शिवसेनेकडे केलेल्या तक्रारींची दखल घेऊन गुरुवारी सकाळी मुक्ताबाई अंगणवाडीमध्ये मौकास्थळी जाऊन चौकशी केली. यावेळी मुक्ताबाई अंगणवाडी केंद्र क्रमांक ९३, ९४, ९५ (४११) यामध्ये बालकांना निकृष्ट दर्जाचे आहार देण्यात येत असल्याचे निदर्शनास आले. तसेच महिला बचत गटाच्या माध्यमातून बालकांना गरम पोषण आहार व्यवस्थितरित्या करून देण्यात येत नसून त्या आहारात अळ्या व सोंड्या निघून येतात. याबाबत अंगणवाडी सेविकाकडून अनेकदा तक्रार करूनही संबंधित अधिकारी याकडे डोळेझाक करीत असून येथे साधी पाहिनी सुध्दा केली जात नाही. यामुळे गेल्या अनेक वर्षांपासून अंगणवाडी सेविका व पालकवर्गामध्ये तीव्र संताप व्यक्त करण्यात येत आहे. भंडारा जिल्ह्याचे बालविकास प्रकल्प अधिकारी तुषार पौणिकर, सहाय्यक रचना घरवार यांच्यासह संबंधित खात्याच्या अधिकाऱ्यांना याप्रकरणी शिवसेनेने निवेदनाद्वारे माहिती दिली. सदर महिला बचत गटाच्या माध्यमातून शिळे, बुरशी, जाळे असलेल्या अन्न बालकांना देण्यात येत आहे. यामुळेच मुक्ताबाई अंगणवाडीमध्ये बालकांच्या प्रकृती बिघडत असल्याची माहिती दिली आहे. शिवसेनेने गुरुवारी सकाळी मुक्ताबाई अंगणवाडीला भेट देऊन पाहणी केली. लहान मुलांच्या जीवाशी खेळ करून निकृष्ठ आहार पुरवठा करणाऱ्या संबंधित बचत गटावर नियमानुसार कारवाई करून चौकशीही करावी अशी मागणी करण्यात आली. यावेळी शिवसेनेचे विभाग प्रमुख अमित एच मेश्राम, अंगणवाडी सेविका बबिता सारंगपुरे यासह काही पालक वर्ग उपस्थित होते.
ही माहिती मिळताच “पोलीस कि आवाज न्युज” प्रतिनिधी ने बालविकास प्रकल्प अधिकारी तुषार पौवनणिकर यांच्या सी मोबाईल फोन वर बोलण्याचा प्रयत्न केला असता त्यांच्याकडून कोणत्याही प्रकारचा प्रतिसाद मिळाला नाही.

प्रशासनामार्फत बालकांना पोषक आहार मिळावा, यासाठी अंगणवाडीमध्ये बचत गटाच्या माध्यमातून आहार पुरविला जातो. मात्र काही ठिकाणी बालकांना पौष्टिक आहार दिला जात नसून निकृष्ठ दर्जाचा आहार पुरवठा केला जातो. अशा तक्रारी अलीकडे वाढू लागल्या आहेत. शिवसेना असला प्रकार खपवून घेणार नाही. यावर संबंधित खात्याच्या अधिकाऱ्यांनी अंगणवाडीत जाऊन तपासणी करणे गरजेचे आहे.