माजी आमदार अनिल बावनकर यांनी घडविलेले विकास कार्य…

तुमसर-मोहाळी वार्ता-माजी आमदार अनिल बावनकर यांचे विकास कार्य प्रशंसनीय आहेत.
माजी आमदार अनील बावनकर यांची सुरवात नगरसेवक -पाणी पुरवठा सभापती व उपाध्यक्ष तसेच तुमसर- मोहाळी विधानसभा क्षेत्राचे आमदार राहुन जनतेसाठी अनेक विकासात्मक कार्य घडवुन आनले. यामध्ये बावनथडी प्रकल्प मार्गी लाऊन सोंड्या उपसा सिंचन योजना पुर्ण करुन घेतले. जेणेकरून शेतकऱ्यांच्या शेतापर्यंत पाणी सिंचनाची सुविधा उपलब्ध करुन शेतकरी व येणाऱ्या त्यांच्या पुढच्या पिढीची चिंता दुर केली.
माजी आमदार अनिल बावनकर यांचा राजकीय व सामाजिक जीवन संघर्ष तुमसरात व परिसरात घडून आले.
त्यांच्या केलेल्या कामाची पाहणी करुन त्यांना सन 2009 मध्ये राष्ट्रीय काँग्रेस पक्षाने तुमसर-मोहाळी मतदारसंघातून उमेदवारी दिली त्यामध्ये ते विजयी झाले. पाच वर्षांच्या आमदारकी च्या कालावधीत जनतेच्या सेवेसाठी अनेक विकास कामे केली.
त्यांनी सुसुरडोह ह्या सारख्या गावाचे पुनर्वसन करुन गावकऱ्यांना मुलभुत सुविधा उपलब्ध करुन दिल्या. बावनथडी प्रकल्पातून तुमसर व मोहाळी तालुक्यातील धानाची शेती सिंचीत होते तर चांदपुर प्रकल्पाचा लाभ सिहोरा सर्कल मधिल अनेक गावातील शेतकऱ्यांच्या शेतीला होत आहे. ह्यामुळे शेतकऱ्यांच्या परिस्थितीत सुधारणा झाली आहे.
