अवैध रेती वाहतूक करणारा ट्रॅकर पोलीसांच्या ताब्यात…
भंडारा जिल्हा वार्ता:-पोलीस कि आवाज न्युज ला मिळालेल्या माहितीनुसार तुमसर तालुक्यातील सिहोरा पोलीस स्टेशन येथील मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे कर्मचारी गस्तीवर असतांना एक निळ्या रंगाचा ट्रॅकर अवैधरित्या रेती भरून जातांना मिळुन आल्याने ट्रॅकर ला थांबवुन पोलीस कर्मचाऱ्या कडून वाहनात असलेली रेती रॉयल्टी व ट्रॅकर बाबत विचारना केली असता ट्रॅकर चालकाने कोणताही परवाना सादर केला नाही.
सदर वाहनात एक ब्रास रेती किंमत अदांजे 2000/- रुपये व ट्रॅकर ट्राली किंमत अंदाजे 500,000/-रु.अशी एकूण किंमत 50,2000/-रुपयांचा माल मिळुन आल्याने आरोपी ट्रॅकर चालक प्रदिप रामलाल ढबाले. याच्यावर फिर्यादी पोलीस शिपाई सवालाखे यांच्या लेखी तक्रारी वरुन गुन्हा नोंद करण्यात आला.
सदर ची कार्यवाही
मा. पोलीस अधीक्षक नुरुल हसन, अपर पोलीस अधीक्षक ईश्वर कातकडे

यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक पोलीस स्टेशन सिहोरा नितीन मदनकर व पोहवा राजु साठवने ,पोलीस शिपाई रवींद्र सवालाखे हे करीत आहेत.