Uncategorized
एस. टी. कर्मचा-यांच्या प्रत्येक सुखदुखात व न्याय मागण्यासाठी जिल्हा इंटक सर्वतोपरि सहायता करेल.-श्री. धनराज साठवणे जिल्हाध्यक्ष इंटक भंडारा
एस. टी. कर्मचा-यांच्या मागण्यासाठी मागील कित्येक वर्षांपासून एस.टी. वकर्स कॉंग्रेस (इंटक) लढा देत आहे. ही एकमेव संघटना आहे जी कर्मचा-यांच्या हितासाठी अहोरात्र परिश्रम घेत आहे. व त्यांच्या कुटूंबांची व राज्याच्या परिवहनाची जबाबदारी प्रथम कर्तव्य मानून पार पाडत आहे. यामध्ये सरकार आपले मोहरे व बांडगुळे पाठवून कर्मचारी विरूध्द कार्य करीत आहे परंतु दिखाऊपणाचा आव आणून फक्त श्रेय लाटण्यासाठी वैयक्तिक कुटूंबालाही राजकारणात आणण्याचा व कर्मचा-यांच्या नावे राजकारण करून स्वार्थ साधण्याचे कार्य करीत आहेत. अषा समाज विघातक लोकांना कर्मचा-यांनी व एस.टी. प्रशासनाने दूर ठेवावे असे प्रतिपादन मुकेश तिगोटे सरचिटणीस महाराष्ट्र राज्य यांनी राज्यस्तरीय कार्यकारीणी बैठक व विदर्भ मेळावा भंडारा येथे याप्रसंगी केले.
एस.टी. कर्मचा-यांचे भत्ते आणि ईतर सुविधांबाबत बिनडोक व निरक्षर सरकार तरतूद असतांनाही दर 4 वर्षानंतर जाणूनबुझून करार करीत नाही. परंतु वाढत्या परिस्थितीमध्ये ज्या सुविधांची आवष्यकता आहे व भत्त्यांची आवश्यकता आहे. त्यांना कुटनितीकपणे बगल दिली जाते व सेवा म्हणून कर्मचारी याच्या भावनांचा व त्यांच्या कुटूंबाचा आर्थिक विचार न करता शासन शोषन करीत आहे. ही वास्तविकता इंटकच्या माध्यमातून व वेगवेगळया संघटनांच्या माध्यमातून जनतेपर्यंत पोहचविणे व अंधभक्तांचे डोळे खोलण्याचे कार्य समाजात करण्याचे धाडस कर्मचारी संघटनांनी करावे असे महत्वपूर्ण वक्तव्य श्री. धनराज साठवणे यांनी याप्रसंगी केले.
याचबरोबर कर्मचा-यांच्या समस्या या एस. टी. शी संबंधीत लोकांनीच करावे व वकील किंवा डॉक्टरी पेश्यातील लोकांना कर्मचा-यांनी व त्यांच्या कुटूंबीयांनी दूर ठेवावे असाही सल्ला जिल्हयातील समस्त इंटक कार्यकर्ते व इतर शासकीय कर्मचा-यांना श्री. धनराज साठवणे जिल्हाध्यक्ष भंडारा इंटक यांनी दिले.
याप्रसंगी महिला कर्मचा-यांनी आपली जबाबदारी ओळखून कोणती संघटना त्यांच्या हितासाठी सत्य व सातत्याने कार्य करते हे ओळखून संघटनेमध्ये अधिकाधिक व हिरीरीने भाग घ्यावा. असे आव्हाहन गौरी सोनटक्के राज्य उपाध्यक्ष यांनी केले.
या कार्यक्रमास यषस्वीपणे पार पाडण्यासाठी सुरेश दहेकर विभागीय सचीव भंडारा, प्रषांत ढोबळे, विकास तिवारी इ. नी परिश्रम घेतले. या कार्यक्रमास जिल्हा इंटक कार्यकारीणीचे महासचिव श्री लखनलाल चवरे, सचिव नरेश कावळे, उपाध्यक्ष सुरेश काटेखाये, जिल्हा सद
स्य खंडाईत साहेब, भंडारा महिला अध्यक्ष स्नेहा भोवते, तालुका अध्यक्ष भावना बोरकर, भंडारा तालुकाध्यक्ष अमरदीप नागपूरे, चंद्रपूर जिल्हाध्यक्ष प्रविण लांडगे, विभागीय अध्यक्ष उत्तम बनसोडे, दत्तात्रय बन्सोड, नरेंद्र राजपूत, श्रीकांत नडडू, लक्ष्मीकांत चौधरी, अतुल निंबाळकर, ईस्माईल पठाण, प्रविण डफरे, प्रभाकर धकाते, महेंद्र टेंभरे, महिला जिल्हाध्यक्ष सुनंदा धनजोडे इत्यादी कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते.
