गौवंश तस्करावर पोलीसांची कार्यवाही…!
भंडारा जिल्हा वार्ता:-पोलीस कि आवाज न्युज नेटवर्क ला मिळालेल्या माहितीनुसार
मा. जिल्हा पोलीस अधीक्षक नुरुल हसन व अपर पोलीस अधीक्षक ईश्वर कातकडे यांच्या सुचनेनुसार ,साकोली पोलीस स्टेशन चे पोलीस निरीक्षक मा.संजय गायकवाड

यांच्या मार्गदर्शनाखाली पोहवा महादेव मडावी पो. शिपाई शेंडे , शिंदे मौजा झाडगाव कडून साणगडी कडे रस्त्यावर नाकाबंदी केली असता माल वाहक गाडी 1700 कंपनी चा गाडी क्रं. एम. एच. 36 ए. ए. 2974 मध्ये गौवंश 5 जनावरांना अवैधरित्या परवाना नसताना क्रूरतेने, दाटीवाटीने, निर्दयतेने डांबुन चारा पाणी न देता मिळुन आल्याचे पोलीस स्टेशन साकोली येथे लेखी तक्रार वरुन अप. क्र. 524/2024कलम 11(1)( ड) (च) ( ई) प्राणी निर्दयतेने वागणूक प्रतिबंधक कायदा सहकलम 119 महा. पोलीस अधिनियम कायदा सह. 9 , महा. प्राणी संरक्षण कायदा अन्वे गुन्हा नोंद करण्यात आला. गुन्ह्यात तिन मोठे (बैल) किंमत 30,000 -/-रुपये, एक लाल रंगाचे बैल कि कि. 10,000/-रु.,एक काळा रंगाचा बैल कि. 10,000/-,काळसर रंगाचे बैल किंमत 50,000/-, माल वाहक गाडी किं. 5,00,000 /- असा एकुन 5,50,000 (पाच लाख पन्नास हजार) रुपये चा मुद्दे माल जप्त केला असुन आरोपी विरुद्ध गुन्हा नोंद करण्यात आला आहे.पुढील तपास पोलीस निरीक्षक संजय गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली पोहवा महादेव मडावी करित आहेत.
