Uncategorized
पोलीस स्टेशनला शांतता व सुव्यवस्था ची बैठक संपन्न…

भंडारा जिल्हा वार्ता:-पोलीस कि आवाज न्युज नेटवर्क ला मिळालेल्या माहितीनुसार दिनांक ९ सप्टेंबर ला पोलीस स्टेशन अड्याळ येथे पार पडली
.मा. भंडारा जिल्हा चे सिंगम गणले जाणारे जिल्हा पोलीस अधीक्षक मा. नुरुल हसन यांच्या उपस्थितीत तथा सुचनेनुसार उपविभागीय पोलीस अधिकारी पवनी श्री मनोज सिडाम तसेच पोलीस स्टेशन अड्याळ चे ठाणेदार श्री धनंजय पाटील

यांच्या उपस्थितीत गणेश उत्सव व येणारे सन त्यौहार तसेच ईद- ए-मिलाद निमित्ताने बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.

सदर बैठकीत अड्याळ पोलीस स्टेशन परिसरातील सर्व पोलीस पाटील, गणेश उत्सव समितीचे प्रतिनिधी, जातीय सलोखा समितीचे सदस्य, महिला दक्षता समिती चे सदस्य, विविध जाती धर्माचे स्थानिक नागरिक व स्थानिक पत्रकार उपस्थितीत होते. या बैठकीत गणपती उत्सव शांततेत पार पाडावी याकरिता मंडळाचे आयोजक यांच्या अडचणी च्या समस्यांचे निराकरण करण्यात आले. उत्सव दरम्यान शांततेत बाधा येऊ नये व शांतता, सुव्यवस्था बाधित होऊ नये याबद्दल मार्गदर्शन करण्यात आले तसेच नागरिकांसी संवाद साधण्यात आला.
