Uncategorized
पोलीस स्टेशन मार्फत रुट मार्च…
भंडारा जिल्हा वार्ता:-भंडारा जिल्ह्यातील मोहाळी पोलीस अंतर्गत मोहाळी शहर येथे दिनांक 9 सप्टेंबर रोजी जिल्हा
पोलीस अधीक्षक भंडारा श्री. नुरुल हसन यांचे

मार्गदर्शनाखाली मा. उपविभागीय पोलीस अधिकारी अशोक बागुल व मा. पोलीस निरीक्षक संजय बेलखेड यांच्या उपस्थितीत गणेश उत्सव व समोर येणारे त्यौहार जसे ईद- ए-मिलाद या सणानिमित्त कानुन व्यवस्था राखण्याच्या दृष्टीने रुट मार्च घेण्यात आले. रुट मार्च दरम्यान दंगा नियंत्रण पथक, पोलीस स्टेशन चे अमलदार, होम गार्ड हजर होते. रुट मार्च मोहाळी शहरातील मुख्य मार्गापासून ते नाग मंदिर, चौंडेश्वरी नाला, इंदिरा गांधीं चौक, ईमामवाडा चौक, कजली चौक, आशिस पात्रे घर, बस स्टाॅप पांईट, जामा मस्जिद, शिवाजी चौक वाडीबस्मे किराणा दुकान आणि परत पोलीस मार्गाने रुट मार्च काढण्यात आला.