अवैध रेती ने भरलेला वाहान पोलीसांच्या ताब्यात…
भंडारा जिल्हा वार्ता:-भंडारा जिल्ह्यात नवनियुक्त जिल्हा पोलीस अधीक्षक येताच अवैध धंद्यांना खुप अंकुश लागला. भंडारा जिल्ह्यातील सर्वच पोलीस स्टेशन एक्सन मोडवर आलेले आहेत.
असाच एक प्रकार लाखनी पोलीस स्टेशनला घडला.

लाखनी स्टेशन लाखनी चे पोलीस निरीक्षक ह्रदयनारायण यादव
यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस स्टेशन हद्दीत पेट्रोलिंग करत असताना गोपनिय माहिती च्या आधारे पोवहा अमितेश वडटवार व पोहवा आशिस निंबार्ते यांना गाव मानेगाव परिसरात गोपनिय माहिती च्या आधारे एक रेती भरलेला ट्रकर राष्ट्रीय महामार्ग 53 वरील डोंगरवार पेट्रोल पंप जवळुन मानेगाव बेळा रस्त्याने जात असलेला दिसल्याने पंचासमक्ष ट्रॅकर मालक अमितेश पंचभाई राह. वलनी तालुका पवनीअसुन बिना परवाना ट्रकर असुन त्याच्याजवळ कोणत्याही प्रकारचे कागदपत्रे नसल्याने आरोपी अमितेश पंचभाई च्या ताब्यातील निळ्या रंगाचा ट्रकर बिना परवाना POWERTRACK ERO47 कंपनी चा ट्रॅक्टर असुन चेसिस क्र.T053635908KM व त्याला जोडलेली निळ्या रंगाची ट्राली असी एकुण किंमत 7लाख रुपये असुन एक ब्रास रेतीची किं. 3हजार रुपये असा एकुन 7लाख 3हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. आरोपी विरुद्ध 324/2024 कलम 303(2) बी. एन. एस. सहकलम 50,139/177अन्वे गुन्हा नोंद करण्यात आला.
पुढील तपास मा. जिल्हा पोलीस अधीक्षक नुरुल हसन यांच्या सुचनेनुसार, पोलीस निरीक्षक हृदयनारायण यादव यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार लाखनी निलेश रामटेके करीत आहेत
