Uncategorized
मोटारसायकल चोर पोलीसांच्या ताब्यात
पोलीस कि आवाज न्युज
भंडारा जिल्हा वार्ता:-भंडारा जिल्ह्यातील साकोली पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या वडद गावात चेतन मसराम मोटार सायकल क्रमांक MH-40 AL 7082 काळ्या रंगाची मोटर सायकल अज्ञात इसमाने नेलीअसल्याचे पोलीसांना तोंडी तक्रारी वरुन कळविले असताना तक्रारी वरुन अप. क्र. 427/2024 कलम कलम 303(2) BNM अन्वे गुन्हा नोंद करुन अवघ्या काही तासातच आरोपी चा शोध घेतला.

नवनियुक्त जिल्हा पोलीस अधीक्षक तथा भंडारा जिल्हा चे सिंगम नुरुल हसन , अप्पर पोलीस अधीक्षक ईश्वर कातकडे व उपविभागीय पोलीस अधिकारी सुशांत सिंग

यांच्या मार्गदर्शनाखाली चोवीस तासाच्या आतच आरोपी ला साकोली चे पोलीस निरीक्षक संजय गायकवाड व त्यांच्या टीम
ने बस स्थानकावरून CCTV फुटेच च्या आधारे ताब्यात घेतले.
