लाखांदूर आणि पवनी जातीय सलोखा व शांतता समीती ची सभा आयोजित…
भंडारा जिल्हा जिल्हा वार्ता:-पोलीस कि आवाज न्युज नेटवर्क ला मिळालेल्या माहितीनुसार मा पोलीस अधीक्षक मा नुरुल हसन यांच्या सुचनेनुसार पवनी व लाखांदूर येथे गणेशोत्सव व ईद -ए मिलाद या निमित्ताने शांतता व जातिय सलोखा समिती बैठक घेण्यात आली .
ही सभा अपर अपर पोलीस अधीक्षक मा.ईश्वर कातकडे भंडारा यांच्या अध्यक्षतेखाली व मनोज सिडाम उपविभागीय पोलीस अधिकारी पवनी सोनोन तहसीलदार साहेब पवनी, पोलीस निरीक्षक पवनी निलेश ब्राम्हने , लाखांदूर पोलीस स्टेशन चे पोलीस निरीक्षक मा. सचिन पवार तसेच पवनी व लाखांदूर चे प्रशासकीय अधिकारी, कनिष्ठ अभियंता पोलीस पाटील, तंटामुक्ती समिती चे अध्यक्ष, गणेशोत्सव मंडळाचे पदाधिकारी मस्जिद कमिटीचे अध्यक्ष, डीजे धारक, शांतता समिती चे पदाधिकारी, महिला दक्षता समिती चे पदाधिकारी सभेला हजर होते.


सदर बैठकीमध्ये आगामी गणेशोत्सव, ई-ए -मिलाद संबधाने कायदा व सुव्यवस्था चा प्रश्न निर्माण होणार नाही , सन उत्सव शांततेत पार पाडावी व उत्सवा दरम्यान परवानगी घेउनच कुठल्याही कार्यक्रमाचे आयोजन करावे असे मार्गदर्शन अपर पोलीस अधीक्षक मा. ईश्वर कातकडे यांनी केले.
ह्या कार्यक्रमात बहुसंख्येने नागरिक उपस्थित होते.