Uncategorized
परसोडी येथे तान्हा पोळ्याचे चोवीस सुशोभित नंदीना बक्षीस वितरण…!
भंडारा जिल्हा वार्ता:-भंडारा जिल्यातच नाही तर संपूर्ण महाराष्ट्रात लहान मुलांच्या आवडीचा सन म्हणून तान्हा पोळा साजरा केला जातो. दिंनाक ३सप्टेंबर ला भंडारा जिल्ह्यातील जवाहरनगर पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या परसोडी गावात तान्हा खुप प्रसिद्ध असून या कार्यक्रमात मा. पोलीस अधीक्षक श्री. नुरुल हसन, अपर पोलीस अधीक्षक श्री. ईश्वर कातकडे, मा खासदार मा. श्री प्रशांत पडोळे, मा .आमदार श्री. नरेंद्र भोंडेकर , मा. सहायक पोलीस निरीक्षक बोरकुटे साहेब, परसोडी गावातील सरपंच व गावकरी उपस्थित होते. मा. पोलीस अधीक्षक नुरुल हसन, मा. अपर पोलीस अधीक्षक श्री. ईश्वर कातकडे मा. खासदार प्रशांत पडोळे, आमदार नरेंद्र भोंडेकर यांच्या हस्ते २४सुशोभित नंदी ना बक्षीस वितरण करुन मान्यवंरानी नागरिकांसी संवाद साधुन तान्हा पोळ्याच्या शुभेच्छा दिल्या.
