वाघाने केली म्हशीची शिकार…!

गोबरवाही वार्ता:-तुमसर तालुक्यातील नाकाडोंगरी वनपरिक्षेत्र कार्यालय अंतर्गत येणाऱ्या गोबरवाही गावातील सार्वजनिक नागझिरा देवस्थान परिसर मधिल १०० मीटर दुरीवर वाघाने एकाच वेळी २म्हैशी ची शिकार केली. ही म्हैश गोबरवाही गावातील मनोज नारायण गराड नावाच्या शेतकऱ्याची आहे. ही घटना दुपारी ०१वाजे.दरम्यान ची असुन चरवाहा गोहन नेत घराकडे येत असताना ही घटना घडली. काही दिवसापूर्वीच ह्या दोन्ही म्हशी नी वासरांना जन्म दिलेला होता. त्या दोन्ही म्हैशीची किंमत अंदाजे १ लाख ५० असेल. ही राशी अताशिघ्र मिळण्याची गरज आहे. आणि जंगल परिसरात हींसक प्राण्यापासून बचावासाठी वन विभागाने कंपाऊंड करुन हिंसक प्राणी येऊ नये अशी व्यवस्था करण्याची गरज आहे. अशा कितीतरी घटना नाकाडोंगरी वनपरिक्षेतील चारही राउंड मध्ये घडत आहेत. वाघाचा दिवसा सुध्दा मुक्त भ्रमन होत त्यामुळे अशा हिंसक प्राण्यांपासून बचावात्मक उपाययोजना शासनाने करणे काळाची गरज आहे.