Uncategorized

वाघाने केली म्हशीची शिकार…!

गोबरवाही वार्ता:-तुमसर तालुक्यातील नाकाडोंगरी वनपरिक्षेत्र कार्यालय अंतर्गत येणाऱ्या गोबरवाही गावातील सार्वजनिक नागझिरा देवस्थान परिसर मधिल १०० मीटर अंतरावर वाघाने एकाच वेळी २म्हैशी ची शिकार केली. ही म्हैश गोबरवाही गावातील मनोज नारायण गराड नावाच्या शेतकऱ्याची आहे. ही घटना दुपारी ०१वाजे.दरम्यान ची असुन चरवाहा गोहन नेत घराकडे येत असताना ही घटना घडली. काही दिवसापूर्वीच ह्या दोन्ही म्हशी नी वासरांना जन्म दिलेला होता. त्या दोन्ही म्हैशीची किंमत अंदाजे १ लाख ५० असेल. ही रक्कम अताशिघ्र मिळण्याची गरज आहे.वाघ हा प्राणी नाकाडोंगरी वनपरिक्षेतील येणाऱ्या चारही राउंड मध्ये दिवसा सुध्दा मुक्त भ्रमन करत असल्याचे अशा कित्येक घटना पहायला मिळत आहेत. जंगल परिसरात हींसक प्राण्यापासून बचावासाठी वन विभागाने कंपाऊंड करुन हिंसक प्राणी येऊ नये अशी व्यवस्था करण्याची गरज आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button