Uncategorized

अनिकेत मनोज डोंगरे सर्वोच्च न्यायालयात आणि आंतरराष्ट्रीय मंचावर निवड!

तुमसर: सामाजिक कार्यकर्ते आणि कायद्याचे विद्यार्थी अनिकेत मनोज डोंगरे यांना सर्वोच्च न्यायालयात न्यायमूर्ती मा. ना. श्री. अभय ओक यांच्या कडे इंटर्नशिप करण्याची सुवर्णसंधी प्राप्त झाली आहे. याशिवाय, त्यांनी International Model United Nations (IMUN) मध्ये Kaula Lumpur, मलेशिया येथे सहभाग घेण्यासाठी निवड मिळवली आहे. तसेच, अनिकेत यांची “Best Diplomats” यादीत Istanbul, Turkey 2024 येथे निवड झाली आहे, हे त्यांच्या आंतरराष्ट्रीय कर्तृत्वाचे प्रतीक आहे.

{“remix_data”:[],”remix_entry_point”:”challenges”,”source_tags”:[],”origin”:”unknown”,”total_draw_time”:0,”total_draw_actions”:0,”layers_used”:0,”brushes_used”:0,”photos_added”:0,”total_editor_actions”:{},”tools_used”:{},”is_sticker”:false,”edited_since_last_sticker_save”:false,”containsFTESticker”:false}

अनिकेत डोंगरे सध्या महाराष्ट्रातील अव्वल असलेल्या शासकीय विधी महाविद्यालय, मुंबई येथे B.L.S., LL.B च्या अंतिम वर्षात शिकत आहेत आणि त्यांच्या सामाजिक कार्यामुळे त्यांनी अनेक ठिकाणी समाजाचे नाव उज्ज्वल केले आहे. तुमसरमध्ये त्यांनी अनेक आंदोलनांचे आणि सामाजिक कार्यांचे नेतृत्व केले आहे. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची विचारधारा आणि तत्वज्ञानाच्या प्रेरणेने, अनिकेत यांनी समाजातील अनेक समस्यांवर प्रकाश टाकला आहे आणि त्यांच्या कार्यामुळे समाजातील पुढे जाणाऱ्या अनेक लोकांची प्रेरणा मिळवली आहे.

{“remix_data”:[],”remix_entry_point”:”challenges”,”source_tags”:[],”origin”:”unknown”,”total_draw_time”:0,”total_draw_actions”:0,”layers_used”:0,”brushes_used”:0,”photos_added”:0,”total_editor_actions”:{},”tools_used”:{“transform”:1},”is_sticker”:false,”edited_since_last_sticker_save”:true,”containsFTESticker”:false}


त्यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या न्यायमूर्ती भारती डांगरे, भारतातील Tier-1 फर्म DSK Legal, DUA Associates, SAMVAD Partners, सारख्या अनेक प्रतिष्ठित Law Firm मध्ये काम करून अनुभव मिळवला आहे. त्यांच्या आंतरराष्ट्रीय आणि राष्ट्रीय स्पर्धांमध्ये भागीदारीने त्यांच्या कार्यक्षमतेला तरावले आहे.

सर्वोच्च न्यायालयाच्या इंटर्नशिपसाठी मा. ना. श्री. रामदास आठवले, खासदार तथा राज्य मंत्री, सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग यांनी अनिकेत यांना उत्साही प्रोत्साहन दिले असून त्यांच्या पुढील यशासाठी शुभेच्छा दिल्या.

{“remix_data”:[],”remix_entry_point”:”challenges”,”source_tags”:[],”origin”:”unknown”,”total_draw_time”:0,”total_draw_actions”:0,”layers_used”:0,”brushes_used”:0,”photos_added”:0,”total_editor_actions”:{},”tools_used”:{},”is_sticker”:false,”edited_since_last_sticker_save”:false,”containsFTESticker”:false}

तसेच, अनिकेत यांचे कुटुंब, आई, आणि समाजातील आंबेडकरी कार्यकर्ते राहुल डोंगरे, सतीश रंगारी, प्रणाली डोंगरे, मयूर डोंगरे, उज्ज्वल रहांगडाले, संतोष धार्मिक,
आणि मित्रपरिवाराने त्यांना विशेष शुभेच्छा दिल्या आहेत.

अनिकेत डोंगरे यांच्या या यशस्वी वाटचालीमुळे तुमसर शहराचा, त्यांच्या कुटुंबाचा आणि समाजाचा मान उंचावला आहे. त्यांच्या उज्ज्वल भवितव्याच्या प्रतीक्षेत असलेला सर्वांचाच आनंद आणि गर्व आहे.

#तुमसारतील मुलगा सर्वोच्च न्यायालय दिल्लीत!

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button