Uncategorized
पाणी काढून रस्ता मोकळा करावे…
भंडारा जिल्हा:-तुमसर ते तिरोडी मार्गावरील तुमसर टाऊन जवळ हसारा टोली येथे रेल्वे प्रशासनाने तयार केलेला बोगदा धोकादायक झालेला आहे. हसारा येथील सरपंच धनराज आगाशे यांनी रेल्वे प्रशासनाला लेखी तक्रार सादर करुन पत्रा अन्वये आंदोलन करण्याचा ईसारा देला आहे.

सतत पाणी येत असल्याने पाणी जाणारा-येणाऱ्या मार्गावर पाणी साचुन असल्याने अंदाजे ४ ते ५ फिट पाणी त्या ठिकाणी साचलेला असतो त्यामुळे विद्यार्थ्यांना व हसारा वासीयांना दोन ते तिन किलोमीटर अंतरावरून फिरुन जावे लागते. जनतेची समस्या लक्षात घेऊन रेल्वे प्रशासनाने लक्ष देण्याची गरज आहे.
