चिखला व डोंगरी बुजुर्ग- मॉईल क्षेत्र परिसरात मॅग्नीज चोरी जोरात
तुमसर वार्ता:-भंडारा जिल्ह्यात जगप्रसिद्ध चिखला व डोंगरी बुजुर्ग-अशा दोन मॉईन आहेत . ह्या मॉईन परिसर क्षेत्रातील मोठ्या प्रमाणात मॅग्नीज चोरी दिसून येत आहे. सुंदरटोला व राजापूर गाव परिसरात काळा दगडाचे प्लांट सुरु असुन ह्या प्लांट मध्ये जंगल परिसरात दहा ते पंधरा ठेकेदार असुन चोरी करणारे काळा माल चोरी करून प्लांट मध्ये कमी दरात विक्री केली जाते. ह्या मॅग्नीज चोरी व्यवसायात चिखला, राजापुर आणि सुंदरटोला परिसरातील महिला, पुरुष व युवा मुले यांचा समावेश आहे.

मॅग्नीज चोरी केल्याल्या मालाच्या वाहतूकीसाठी टाटा सुमो, ट्रक्टर, पीक- अप अशा वाहणाचा उपयोग होतो. जर यांना काही रोकरोक केली तर ते दादागिरी वर उतरतात. ह्या काळा मालाचा गोरखधंदा कोणाच्या आशिर्वादाने सुरु आहे. याची पडताळणी करने गरजेचे आहे.

ह्या मॅग्नीज चोरी व्यवसात हजारो टन काळा माल वाहतूकीने जात असुन प्रशासन का मौन आहे असा सवाल परिसरातील जनता करित आहे.



