नाकाडोंगरी ग्रामपंचायत गाव विकासात अग्रेसर…
तुमसर वार्ता:-नाकाडोंगरी मध्ये सुमित जी गौपाले यांनी ग्रामपंचायत मध्ये सरपंच पदाचा पदभार सांभाळताच गाव विकास कामामध्ये खुप परिश्रम करून यस संपादन केले. गावामध्ये नाली, रस्ते, लाईट व लोकांच्या कामासाठी चोवीस तास कार्यरत असतात.

नाकाडोंगरी गावातील मुख्य चौकात सौर उर्जा चा दिवा लावून नाकाडोंगरी गावात वेगळा उपक्रम राबवले. तसेच आठवडी बाजार चौकात पीण्याचे पाणी टंकी लाऊन बाजारातील दुकानदार व ग्राहक यांना पिण्याच्या पाण्याची सोय उपलब्ध करून दिली. बाजारच्या ठिकाणी सिमेंट रस्ता व मुरुम घालुन व्यापारी व ग्राहक यांना चालण्यासाठी त्रास होऊ नये म्हणून सपाटीकरण केले. ह्या उत्कृष्ट कार्यामध्ये ग्रामपंचायत कार्यालयाचे समस्त पदाधिकाऱ्यांचा सहकार्य लाभतो. तसेच ग्रामपंचायत कर्मचारी व शासकीय कार्यालयातील अधिकारी व कर्मचाऱ्यांवर चांगलिच देखरेख आहे.
खरचं असे सरपंच गावाला लाभने म्हणजे गावातील नागरिकांचा सर्वांगीण विकास होणे होय !




