क्राइम
वाघाच्या हल्यात म्हैशीची झाली शिकार!
राजेश ऊके , न्युज एडीटर
तुमसर वार्ता:-भंडारा जिल्ह्यातील तुमसर तालुक्यात नाकाडोंगरी वनपरिक्षेत्रात पर्याप्त जंगल असल्यामुळे अनेक हिंसक वन्यप्राणी विचरण करित असतात.

सविस्तर वृत्त असे की हिरापुर हमेशा जंगलात धुटेरा निवासी चंदुलाल राठौर यांनी आपले जनावरे नाकाडोंगरी वनपरिक्षेत्रातील हिरापुर हमेशा जंगलात चराईकरिता नेले असतांना दुपारी जंगलात दबा धरुन असलेल्या वाघाने एका म्हैशीवर हमला करुन तिला ठार केले. ह्यामध्ये पशुपालकाचे मोठे नुकसान झाले आहे आणि पशुपालकामध्ये भिती चे वातावरण निर्माण झाले आहे.

घटनेची माहिती वनपरिक्षेत्र अधिकारी मनोज मोहिते यांना मिळताच त्यांनी तात्काळ वन अधिकारी मेश्राम व वन कर्मचारी यांच्या सह घटनास्थळी जाऊन पंचनामा केले.
परिसरातील शेतकरी व पशुपालकांनी नुकसान ग्रस्त पशुपालकाला शासनाकडून नुकसान भरपाई देण्यात यावी अशी मागणी केली आहे.



