तुमसर पोलीस द्वारा रोड मार्च
महाराष्ट्र एवं मध्यप्रदेश में एकसाथ प्रसारित
पोलीस कि आवाज न्यूज़ मीडिया
भंडारा जिला:-
आगामी श्रीराम नवमी, लोकसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 शांततेत पार पडावी आणि कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये या करिता पोस्टे तुमसर हद्दीतील तुमसर शहरांमध्ये आज दिनांक 16/04/2024 चे ५.४५वा ते ७.००वां दरम्यान रोड मार्च घेण्यात आला.
सदर रोड मार्च मध्ये मा. सहाय्यक पोलीस अधीक्षक रश्मिता राव मॅडम,08 अधिकारी, पोलीस स्टेशन तुमसर येथील 20 पोलीस अंमलदार, RPF चे 11 अंमलदार, मिरा भईंदर आयुक्तालय येथील 32 अंमलदार Rpts नागपुर येथील 150 महिला प्रशिक्षणार्थी, वर्धा होमगार्ड 239, भंडारा होमगार्ड 53 असे एकुण 09 अधिकारी 505 अंमलदार/होमगार्ड सदर रूट मार्च दरम्यान हजर होते. सदर रूट मार्चमध्ये एस.डी.पि.ओ.मोबाईल, पिटर मोबाईल, डायल 112 मोबाईल, 1 शासकिय दुचाकी वाहन लावण्यात आले होते.

सदर रूट मार्च पो. स्टे. तुमसर ते मार्केट लाईन ते जैन मंदीर चौक ते मुक्ताबाई चौक ते नांगी चौक ते तहसिल कार्यालय ते आंबेडकर नगर ते माकडे नगर ते जुना बस स्टॉप ते बावनकर चौक ते परत पोलीस स्टेशन तुमसर येथे समापन करण्यात आला. सदर रुप मार्च दरम्यान शांतता राहिली.

सहायक पोलीस निरीक्षक रश्मिता राव यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस स्टेशन चे पोलीस निरीक्षक नरेन्द्र हिवरे व त्यांच्या पोलीस सहकर्मचारी यांच्या उपस्थितित हा कार्यक्रम पार पडला.




