सार्वजनिक बांधकाम विभागाची विफलता…
संपूर्ण महाराष्ट्रात लाखोंच्या संख्येने लोकांपर्यंत पोहचणारा
पोलीस कि आवाज न्युज डिजिटल मिडिया

भंडारा जिल्हा वार्ता:-भंडारा जिल्हातील तुमसर तालुक्यात नाकाडोंगरी-गोबरवाही -चिचोली राष्ट्रीय महामार्गावर सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत बनलेला रस्ता बांधकाम अतिशय निस्कृष्ट दर्ज्याच्या रस्ता बांधकाम झालेला आहे त्या रस्ता बांधकामाच्या कडेला मुरुम कोपिंग सुध्दा झालेला नाही. त्यामुळे दुकाची व चारचाकी वाहनांना रस्त्याच्या कडेला जाऊन डांबरी रस्त्यावर येण्यासाठी खुप त्रास होउन अपघात होण्याची शक्यता नाकारता येणार नाही.


हा करोडो काम असुन ह्या रस्त्याची दुर्दशा का?
राष्ट्रीय महामार्ग असल्यावरही सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी असे कानाडोळा करतात तर आतल्या रस्त्यावर कशा प्रकारचे बांधकाम होत असेल?
वारंवार बातमी प्रकाशित होऊन सुध्दा अधिकाऱ्यांना जाग येत नाही ही मोठी खंताची बाब आहे.

बातमी प्रकाशित होताच राष्ट्रीय महामार्गावरुन सार्वजनिक बांधकाम प्रशासन कोणते पाऊल उचलते अशा आशेच्या किरणात रस्ता सुधारणेची प्रतिक्षा करित आहेत.




