Uncategorizedशालेय

‌स्वेरीज कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगच्या कु. प्रणाली भजनावळे यांचा राष्ट्रीय पातळीवरील इंग्रजी लेखन स्पर्धेत प्रथम क्रमांक!!

पोलीस की आवाज न्यूज नेटवर्क वार्ता प्रमिला जाधव (पश्चिम महाराष्ट्र )सहसंपादक

पंढरपूर: डब्ल्यू.डी.डी.डी. (वर्ल्ड डिजिटल डीटॉक्स डे) इंटरनॅशल व झेप संघटना आयोजित राष्ट्रीय पातळीवरील इंग्रजी लेखन स्पर्धेत स्वेरीज कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगच्या सिव्हील इंजिनिअरिंग या विभागात द्वितीय वर्षात शिकत असलेल्या कु. प्रणाली भजनावळे यांनी प्रथम क्रमांक पटकावला. कु. भजनावळे यांनी ‘डिजिटल डीटॉक्स- नीड ऑफ द टाईम’ या विषयावर इंग्रजीमध्ये प्रभावी लेखन केले होते.

सदर स्पर्धेचा पारितोषिक वितरण समारंभ दि. ०५ डिसेंबर २०२३ रोजी मुंबई येथे गेट वे ऑफ इंडिया या ठिकाणी होणार असून त्यांना या कार्यक्रमासाठी आमंत्रित करण्यात आले आहे. या यशाबद्दल स्वेरीचे संस्थापक सचिव व प्राचार्य डॉ.बी.पी.रोंगे, संस्थेचे अध्यक्ष दादासाहेब रोंगे, उपाध्यक्ष हनीफ शेख तसेच संस्थेचे सर्व विश्वस्त व पदाधिकारी, कॅम्पस इन्चार्ज डॉ.एम.एम. पवार, सिव्हील इंजिनिअरिंगचे विभागप्रमुख डॉ. प्रशांत पवार, विद्यार्थी अधिष्ठाता डॉ. महेश मठपती, स्वेरी अंतर्गत असलेल्या इतर महाविद्यालयांचे प्राचार्य, अधिष्ठाता, विभागप्रमुख, प्राध्यापक वर्ग, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी व पालकांनी कु. प्रणाली भजनावळे यांचे अभिनंदन केले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button