क्राइम
एका पत्रकारावर लोंखंडी वस्तुने मारहाण
संपूर्ण महाराष्ट्रात सर्वांत जास्त पसंतीदा
पोलीस कि आवाज न्युज मिडिया

भंडारा जिल्हा वार्ता:-भंडारा जिल्ह्यातील वरठी येथील रहिवासी अमर भालचंद्र वासनिक (पत्रकार) हे आपल्या कॅम्पुटर, झेरॉक्स दुकानाकडे जात असताना आरोपी मोनु यादव फिर्यादी च्या मागे फटाका फोडला यावरून फिर्यादी अमर वासनिक याने आरोपी ला हटकले असता आरोपी ने तुझ्या बापाची जागा आहे काय? असे बोलून वादावाद सुरु केला आणि फिर्यादी च्या दुकानाचा काच फोडुन त्यांच्या पायावर लोखंडी वस्तू ने मारुन दुखापत केली व शिविगाळ करुन मारण्यापिटण्याची धमकी दिली.
फिर्यादी च्या तोंडी तक्रारीवरून डॉक्टरी रिपोर्ट वरुन गुन्हा नोंद करण्यात आला.
ह्या घटनेचा पुढील तपास वरठी पोलीस स्टेशन चे ठाणेदार अभिजित पाटील व त्यांचे सहकारी पोलीस कर्मचारी करित आहेत.




