वाहतुक नियंत्रण शाखा भंडारा तर्फे अल्पवयीन वाहक चालक व मालकावर कार्यवाही ची विशेष मोहीम!

संपूर्ण महाराष्ट्रात सर्वांत जास्त पसंतीदा
पोलीस कि आवाज न्युज नेटवर्क
भंडारा जिल्हा वार्ता-भंडारा जिल्ह्यातील वाहतूक शाखा नियंत्रण विभागातर्फे मान लोहित मतानी (पोलीस अधीक्षक), ईश्वर कातकडे (अपर पोलीस अधीक्षक) यांच्या आदेशानुसार कर्तव्यदक्ष पोलीस निरीक्षक सुभाष बारसे वाहतूक नियंत्रण शाखा भंडारा यांच्या पथकाने भंडारा शहर परिसरात अल्पवयीन वाहन चालक व धोकादायक रित्याने वाहन चालविण्यांवर कार्यवाही ची मोहीम राबविण्यात येत आहे.

त्यामध्ये अल्पवयीन दोन मुले दुचाकी वाहन चालवताना क्रं.१)मोसा क्रं.MH-36 AD1351, २)मोसा MH-36 E7136 या दुचाकी वाहनाचे अल्पवयीन मुले व त्यांच्या ताब्यातील वाहने आणि वाहनाचे मालक यांना पोलीस स्टेशन भंडारा येथे कलम १८४,१९९(अ)(१) मोटार वाहन कायदा अन्वे दोन्ही वाहन चालक व मालकावर गुन्हे नोंद करून क.२०७मोटार वाहन कायदा अन्वे दोन्ही दुचाक्यांना पोलीस स्टेशन भंडारा येथे जप्त करण्यात आले आहे.

सदर कार्यवाही पोलीस निरीक्षक सुभाष बारसे वाहतूक नियंत्रण शाखा भंडारा यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक भुषण कोळी , सुनील केवट व त्यांच्या पथकातील सर्व कर्मचारी करत आहेत.



