क्राइम

चार वर्षांपूर्वी कु.अर्चना मानिक राऊत, कवडेवाडा नावाच्या मुलीच्या खुनाचा अवशेष बोरबन,मॉईल परिसरात मिळेल काय? आज आरोपीला न्यायालयात सादर करणार !

पोलीस कि आवाज न्युज नेटवर्क

मिळालेल्या माहितीनुसार गोबरवाही पोलीस स्टेशन अंतर्गत ग्राम कवलेवाडा येथील फिर्यादी मानीक नत्थु राऊत यांनी 20/04/2019 ला कु.अर्चना मानीक राऊत वय 23 रा.कवलेवाडा हि गुम झाल्याचे तोंडी रिपोर्ट गोबरवाही पोलीस स्टेशन दाखल करण्यात आली.


सविस्तर वृत्त असे की हरवलेली मुलगी नामे अर्चना ही नेहमी प्रमाणे संजय चिंतरंजन बोरकर यांच्या घरी कामावर गेली होती परंतु नेहमी प्रमाणे घरी परत न आल्याने तिचे आई-वडील संजय बोरकर यांच्या घरी चौकशी केली असतांना त्यांनी अर्चना ही दुपारीच गेल्याचे सांगितले परंतु मुलीची चप्पल व दुपट्टा आरोपी संजय बोरकर यांच्या दोरीवर लटकलेला पाहिला असता आईने विचारपूस करत असतांना आरोपी ने ओरडत आपल्या घरी निघून जा असे बजावून सांगितले.

> त्यावेळी गोबरवाही पोलीस स्टेशन मध्ये सहाय्यक पोलीस निरीक्षक म्हैसकर साहेब होते परंतु त्यानंतर काही वेळेतचं त्यांचे स्थानांतरण झाले पण त्यानंतर त्या ठिकाणी ” ठाणेदार दिपक पाटील” आले, त्यांनी त्या कार्यकिर्तित वेळीस “पोलीस अधीक्षक” कार्यालयात ह्या विषयाचा पाठपुरावा करुन तत्परता दाखवली असती तर तेव्हाच आरोपी पोलिसांच्या ताब्यात असता आणि आज ही वेळ आली नसती.


गुन्हा चा गोपनीय तपास करताना साक्षीदारांने संपूर्ण हकिकत सांगुन आरोपी संजय बोरकर हा घाबरल्या स्थितीत प्रेत पुरवण्याकरिता रात्रीचे अंदाजे 10वाजे.दरम्यान सब्बल-फावडा घेऊन जात असताना साक्षीदाराने आरोपी चा पाठलाग केला असता चिखला माईन येथे मृतकअर्चना राऊत ईचे प्रेत पुरवण्याकरिता काळहत असतांना आरोपी नामे 1)संजय चितरंजन बोरकर कवलेवाडा 2) राजकुमार उर्फ राजू चिंतरंजन बोरकर कवलेवाडा 3)धरम फागु सयाम, मोहगाव टोला, तहसील तुमसर ह्या तिघांचा पाठलाग साक्षीदार करत असतांना दिसुन आल्याने आरोपी संजय बोरकर याने साक्षीदाराने धमकी दिल्याने साक्षीदार तिथुन घाबरल्या अवस्थेत परत निघाला अशी हकिकत साक्षीदाराने सांगितले ने तिन्ही आरोपी विरुद्ध पोलीस स्टेशन गोबरवाही येथे अप.155/2023 कलम 302,201,34भादवि.नुसार गुन्हा नोंद करुन आरोपींना अटक करण्यात आले.
सदर गुन्हाचा तपास

माननिय लोहित मतानी साहेब पोलीस अधीक्षक भंडारा, ईश्वर कातकडे अपर पोलीस अधीक्षक, रश्मिता राव उपविभागीय पोलीस अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिय गुन्हे शाखेचे उपनिरीक्षक नारायण तुरकुंडे व गोबरवाही पोलीस स्टेशन चे कर्तव्यदक्ष ठाणेदार माननिय नितीन मदनकर पुढील तपास करीत आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button