भंडारा जिल्ह्यातील प्रकरण:- अपहरण करणाऱ्याला बारा तासात अटक करण्यात भंडारा पोलीसांची कामगिरी

पोलीस कि आवाज न्युज नेटवर्क
भंडारा जिल्हा वार्ता-मिळालेल्या माहितीनुसार भंडारा पोलीस स्टेशन अंतर्गत वेंकेटेस नगर खातरोड मधील अपहरण व्यक्ती प्रशांत वहाने हा रात्री उशिरापर्यंत घरी परत न आल्याने त्याची पत्नी इतरत्र शोध घेतला असता तो मिळुन न आल्याने त्याची पत्नी डिपा वहाने यांनी गुमसुधा तक्रार पोलीस स्टेशन भंडारा येथे दाखल केली.
भंडारा पोलीसांकडून शोध घेत असतांना काही तांत्रिक पुराव्यानिशी गुम व्यक्तींचे चार ते पाच इसमांनी जबरण अपहरण करून एका पांढऱ्या रंगाच्या XUV,500 वाहणामध्ये घेऊन गेल्याचे स्पष्ट झाल्याने सदर प्रकरण अप.क्र. 259/2023कलम 365 भा.द.वि.अन्वे गुन्हा दाखल करण्यात आला.

प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन कर्तव्य दक्ष ठाणेदार सुभाष बारसे व त्यांची टीम ने गोपनीय माहितीगार व तांत्रिक पुराव्यानिशी वापरलेल्या वाहानाबाबत शोध घेतले असता गुन्ह्यातील वाहान आरोपी 1) नामे वसीम खान रेशीम बाग नागपुर ,2) मंगेश सावरकर इतवारी मच्छीबाजार नागपुर यांनी पांढऱ्या रंगाचे वाहन वापरली असल्याचे तपासात उघडकीस झाल्याने दोन्ही आरोपीला ताब्यात घेऊन विचारपूस केली असता त्यांनी गुन्हा केल्याचे कबुल केले असुन अपहरण झालेले प्रशांत वहाने याला आरोपीच्या ताब्यातून सोडविण्यात आले. आरोपिंना अवघ्या बारा तासात अटक केली.
पोलीसांच्या शोधामध्ये प्रशांत वहाने यांच्यावर उधारीचे रक्कम च्या कारणावरून अपहरण केल्याचे उघडकीस आले.
पुढील उरलेले आरोपी चा
शोध भंडारा चे सिंघम मानले जाणारे माननिय लोहित मतानी पोलीस अधीक्षक भंडारा, माननिय ईश्वर कातकडे अपर पोलीस अधीक्षक व *श्रीमती *रश्मिता राव सहायक पोलीस अधीक्षक* यांच्या मार्गदर्शनाखाली कर्तव्यदक्ष ठाणेदार सुभाष बारसे पोलीस निरीक्षक भंडारा
यांच्या नेतृत्वाखाली सपोनी सुशांत पाटील,पोउपनी मंगेश कहाडे, पोहवा. प्रशांत भोंगाडे,पोहवा.साजन वाघमारे,पोहवा.बालाराम वरकडे,पोना.सुनील राठोर,पोसी.नरेन्द्र झलके यांनी केली.



